उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला नोटीस बजावण्याचे आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सुरु असलेल्या भूमी संपादनाविरोधात ४० भूखंडधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूमी संपादन कायद्यातील तरतुदीनुसार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम दिली जात असल्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात न्यायाधीश रमेश धनुका आणि न्यायाधीश गौरी गोडसे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच, राज्य सरकारलाही तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.• पाच वर्षे 2 महिन्यात 4 लाख 38 हजार जणांचा प्रवास कोल्हापूर विमानतळ प्रगतीपथावरुन कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली साताऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. गेली पाच वर्षे आणि दोन महिन्यात सुमारे 4 लाख 38 हजार 277 जणांनी कोल्हापूर विमानतळावरुन हवाई प्रवास केला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रवास कोल्हापूर ते हैदराबाद या विमानसेवेचा 54 हजार 330 जणांनी लाभ घेतला आहे. सध्या बंगळुरु, हैदराबाद, तिरुपती, अहमदाबाद येथेही विमानसेवा सुरु असून याचा लाभ प्रवाशांना होत आहे.