सोन्याचा नवा उच्चांक…

मुंबई: एमसीएक्स गोल्डने पहिल्यांदाच ५९००० ची पातळी ओलांडली. एमसीएक्सवर सोन्याने ५९, ४६१ रुपयांचा नवा उच्चांक गाठला.

जागतिक आर्थिक संकटाच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्यात तेजी दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीमध्ये सुमारे 1700 रुपयांची वाढ आहे. तो 68200 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे.आंतरराष्ट्रीय मार्केटमधील स्थिती पाहता आता सोनं एकच तारणहार ठरत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. दुसरीकडे सोन्याचे दरही वाढत आहेत.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यावर्षी आणखी भाव वाढू शकतात. सोन्याचे दर 60 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटानंतर लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहात आहेत.