
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

राज्य विधिमंडळ कामकाज समितीची बैठक विधान भवनात पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार असल्याचे ठरले आहे. एकूण चार आठवड्यांचे अधिवेशन चालणार आहे. तर 9 मार्च रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे.