तुर्कस्तान भूकंप : मृतांचा आकडा ८ हजारांच्या पुढे….

तुर्कस्तान : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठा हाहाकार माजला आहे. ६ फ्रेबुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे जमिनीवर मृतदेहांचे खचच्या खच पडले आहेत. या भागात आतापर्यंत ४३५ छोटे-मोठे भूकंप झालेत.तसेच मृतांच्या संख्येत झपट्याने वाढ होत आहे. बुधवारी दुपारी १२ पर्यंत मृतांचा आकडा ८ हजारांच्या पुढे पोहचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीरिया आणि तुर्कस्तानात झालेल्या भूकंपाने सध्या मृतांचा आकडा ८,३०० असल्याचे समजले आहे. तेतज्ञांच्याम हा आकडा पुढे आणखी वाढू शकतो. दोन्ही ठिकाणी युद्धपातळीवर मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जखमींना वाचवण्याचे काम सुरू आहे.निसर्गाचा कोप असा की, या परिसरात थंडीची मोठी लाट आली आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीत घरातून बाहेर पडणे कठीण आहे. मात्र तरी देखील बचावकर्त्यांचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत हजारो लहान मुलांचा देखील मृत्यू झाल्याची शक्यता आहे.