अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं आहे.गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

कालच ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे वृत्तदेखील समोर आलं होतं, पण आज सकाळी त्यांच्या प्रकृती आणखी ढासळली. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.