राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

याआधी कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याला आज १४ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त राज्यपाल कोश्यारींनी शहिदांना अभिवादन केलं.

यावेळी राज्यपालांनी चप्पल घालून शहिदांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केलं. त्यामुळे राज्यभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा चप्पल घालून श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केला आहे. तसेच राज्यपालांच्या या कृतीवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.