महिला आयोगाकडून रामदेव बाबांना नोटीस…

मुंबई : महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेव अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र महिला आयोगाने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवून दोन दिवसांमध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘ठाण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला ठेच लागेल, असं अभद्र वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची तक्रार महिला आयोगाकडे आली आहे. महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणाची माहिती घेतली.आम्ही याचा तीव्र शब्दात विरोध करतो. बाबा रामदेव यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा दोन दिवसात आयोगाच्या कार्यालयात करावा,’ असं ट्वीट महिला आयोगाने केलं आहे.

काय म्हणाले रामदेव बाबा?

महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं बाबा रामदेव म्हणाले. ठाण्यातील हायलँड भागात पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही उपस्थित होत्या. अमृता फडणवीस यांच्यासमोरच रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं.

News Marathi Content