कोल्हापूर:आशा गटप्रवर्तकांच्या विविध मागण्या व प्रश्नांबाबत बाळासाहेब भवन येथे सविस्तर चर्चा झाली.

शासनाच्या आरोग्य योजना आणि सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्यात गटप्रवर्तकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्या आरोग्य विभाग आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करतात.
त्यांच्या मागण्यांचा सविस्तर व सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. यासाठी ३२०० गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य क्षेत्रात कार्यरत प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
गटप्रवर्तकांच्या योगदानाला योग्य सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलेल.
