खा.धैर्यशील मानेंच्या मागणीला यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील मूलभूत सुविधा व विकास कामांना निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री तथा मंत्री नगर विकास एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी विषयी मागणी केली होती.या मागणीला यश मिळाले असून पंधरा कोटींचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

दरम्यान,राज्यातील नगरपरिषदांना “वैशिष्ट्यपूर्ण” कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. सदर योजनेचे सुधारित निकष व मार्गदर्शक तत्वे शासन निर्णयान्वय विहित करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण या योजनेअंतर्गत राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना निधी व विविध कामे मंजूर करण्यात आलेली आहेत.

यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी अनुक्रमे हुपरी १.५० कोटी, वडगांव १ कोटी, शिरोळ १ कोटी, कुरुंदवाड १ कोटी, पन्हाळा ०.५० कोटी, मलकापूर o.५० कोटी, हातकणंगले १.५० कोटी व जयसिंगपूर ३ कोटी असे विविध विकास कामांसाठी रुपये दहा कोटी तर सांगली जिल्ह्यातील नगरपरिषदांना इस्लामपूर ३ कोटी, आष्टा १ कोटी, शिराळा १ कोटी असे विविध विकास कामांसाठी रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.सदर प्रकल्प खर्चाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्याची माहीती यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी दिली.