संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने आणखी एक धक्का दिला आहे.संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडी ने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांसाठी वाढ करण्यात आली आहे.