शिवसेनेकडून ‘ही’ तीन चिन्ह आणि तीन नावं फायनल !

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यानंतर  आता शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावं निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले आहे.

शिवसेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं ठरवण्यात आली आहे. तसंच शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे अशी नावं देण्यात आली आहे, अशी माहिती अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) दुपारी शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, सुभाष देसाई, अरविंद सावंत उपस्थित होते.

नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदी हे घासलेलं, संपलेलं नाणं आहे. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं खणखणीत नाणं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.मी भाजपशी लढलो, कुटुंबातील लोकांशी लढलो. ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे 63 आमदार निवडून आणले.आता ही शेवटची निवडणूक आहे. आता आपण जिंकलो तर आपलं सगळं मिळवलं. हा निखाऱ्यांवरचा प्रवास आहे. या प्रवासात तुम्ही माझ्या सोबत आहात, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना केलं.