इचलकरंजी काँग्रेसच्यावतीने क्रांतिवीरांना अभिवादन

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने क्रांती दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभात फेरी काढून हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात आले. काँग्रेस कमिटी पासून सुरू झालेल्या या फेरीतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

तदनंतर हुतात्मा स्मारकास काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर,संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासाचा आढावा घेतला व स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला व भविष्यात देशाचे स्वातंत्र्य लोकशाही समता व बंधुता अबाधित राहण्यासाठी सर्वसामान्य माणसात काँग्रेसचा विचार रुजवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल,शशिकांत देसाई, राजन मुठाने,नंदकिशोर जोशी, शशिकांत पाटील,सौ मीना बेडगे,सौ अनिता बिडकर,विद्या भोपळे,सोहेल बांदार,प्रशांत लोले , दिलीप पाटील ,अजित मिनेकर, दिलीप पाटील,शिवा चव्हाण, उदय गीते, राजू काटकर,प्रमोद नेजे, रविराज पाटील, बाळकृष्ण ढवळे,सचिन साठे ,अक्षय कांबळे ,ओंकार आवळकर, नामदेव कोरवी ,रिया चिकोडे,कुणाल भोसले रवी वासुदेव, रियाज जमादार,तेजल पाटील,विनायक मुंजी ,प्रा.रमेश लवटे, किरण बसगीर, राजेश मस्कर ,चंद्रकांत मिस्त्री, सुदाम साळुंखे ,महमदसाब जमादार उपस्थित होते.