नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबायची नाव घ्यायला तयार नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ३३ पैशांनी तर डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सात दिवसांत सहा वेळा वाढ करून तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.
सात दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर 4 रुपये 38 पैशांनी तर डिझेल 4.17 रुपयांनी महागले आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप होत होता. या निवडणुका संपल्यानंतर इंधन दरवाढीचा आलेख चढताच आहे.
देशातील महानगरांमधील दर : दिल्लीत पेट्रोल 99.41 रुपये आणि डिझेल 90.77 रुपये प्रति लिटर, मुंबईत पेट्रोल 114.19 रुपये आणि डिझेल 98.50 रुपये, कोलकात्यात पेट्रोल 108.85 रुपये आणि डिझेल 93.92 रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल 105.18 आणि डिझेलची किंमत 95.33 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.