सुभाष पाटील यांना आदर्श गुरुकुल पुरस्कार प्रदान

सरुड : येथील महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक सुभाष पाटील यांना रयत शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या आदर्श कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य अजितकुमार सूर्यवंशी, विभागीय अधिकारी विजयकुमार हणशी, धन्यकुमार शेटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.  सुभाष पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सांस्कृतिक विविध विषयावर आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी गुरुकुल प्रकल्पाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखती, पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालयात भेटी, जुन्या दुर्मिळ वस्तुंचे प्रदर्शन, शेतकरी भेटीतून माहिती असे अनेक उपक्रम राबवुन सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी उपक्रम राबवले आहेत.