चंदगड तालुक्‍यात हत्तीची पुन्हा एन्ट्री

चंदगड : घटप्रभा नदी पार करून हत्तीने चंदगड तालुक्यात पुन्हा प्रवेश केला आहे. अडकूर, केंचेवाडी परिसरात नागरिकांना हत्तीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे.

  काल आजरा तालुक्यातून आलेल्या हत्तीने गडहिंग्लज तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. तर आज पहाटे चंदगड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला. अडकूर, केंचेवाडी परिसरातील नागरिकांना हत्तीचे दर्शन झाले. हत्तीकडून ऊस, आंबा, केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच नागरी वस्तीत संचार असल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण. हत्ती घटप्रभा नदीत डुंबण्याचा मनसोक्त आनंदही घेतला. डुंबणाऱ्या हत्तीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.