पेनड्राईव्ह प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करणार : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : केंद्रीय यंत्रणाचा वापर करताना आपले प्रवक्ते अमुक- तमुक नेत्यावर कारवाई होणार असे आधीच जाहीर करतात आणि दुसऱ्या दिवशी कारवाई होते. यामध्ये काही हॉटलाईन बसवली आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच विरोधी पक्षनेते न्यायालयात जाणार बोलत आहेत याचा आनंद वाटला ‘एका तरी यंत्रणेवर त्यांचा विश्वास आहे’ असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लगावला.

आज सभागृहात सरकारने गृहविभागासाठी घेतलेले चांगले निर्णय सांगतानाच भाजपने केंद्रीय यंत्रणांचा केलेला गैरवापर, अवैध फोन टॅपिंग, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर झालेली गैरकारवाई यासह देवेंद्र फडणवीस यांनी जो पेनड्राईव्ह सभागृहात दाखल केला त्यावर भाष्य करत सत्य बाहेर काढण्याचे व सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

विरोधी पक्षनेत्यांनी भाषण करत असताना १९९३, २००८ च्या बॉम्बस्फोटाचा विषय काढून त्यावर भाषण केले. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. मी देखील गृहमंत्री म्हणून काम केले आहे असे बोलताना देशात नियमाने काम करणारे असे महाराष्ट्राचे पोलिस दल आहे ही भावना मांडली परंतु असताना दुसऱ्या बाजूला याच पोलिस दलावर विश्वास न ठेवता प्रत्येक प्रकरण सीबीआय किंवा अन्य यंत्रणेकडे द्या, असे विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे दुःखद असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी नमूद केले.