मैं थुकेगा नही..! मैं झुकेगा नहीं…!

कोल्हापूर : एखाद्या जाहिरातीसाठी कोण काय करील, याचा नेम राहिलेला नाही. मैं थुकेगा नही..! मैं झुकेगा नहीं…! लेकिन कचरा देखेगा तो झुकेगा भी, और डस्टबिन मे डालेगा भी! असा आशय असलेला एक फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा पुष्पा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तुफान यश मिळवले. यातील डायलॉग तर अतिशय गाजले असून मै झुकेगा नहीं साला, हा डायलॉग तर सर्वांच्याच तोंडात आहे. सोशल मीडियावर या डायलॉगची मोठी हवा आहे. आणि याच याच डायलॉगचा वापर कोल्हापूर जिल्ह्यातील एका नगरपालिकेने स्वच्छता अभियानासाठी चांगल्या पद्धतीने केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात थुंकीमुक्त अभियान जोर धरू लागले आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत देशपातळीवर स्पर्धा घेतल्या जातात. आणि यात जिल्ह्यातील नगरपालिका सहभागी होतात. पन्हाळा नगरपालिकेने स्वच्छ पन्हाळा, सुंदर पन्हाळा मोहिमेंतर्गत नवनवीन प्रयोग केले आहेत.

पन्हाळा हे एतिहासिक आणि पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. यावर पालिकेने शहर थुंकीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. याचाच भाग म्हणून केलेला एक प्रयोग चांगलाच चर्चेत आला असून सोशल मीडियावर गाजत आहे. पन्हाळा नगरपालिकेने पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन याच्या डायलॉगचा आधार घेत मैं थुकेगा नही..! मैं झुकेगा नहीं…! लेकिन कचरा देखेगा तो झुकेगा भी और डस्टबिन मे डालेगा भी! असे त्याच्या फोटोसह भिंतीवर रेखाटले आहे. आणि स्वच्छ पन्हाळा सुंदर पन्हाळा, असा संदेश दिला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तो मोठा चर्चेचा विषय बनला आहे.