बांधकाम साहित्यातील दरवाढीमुळे घरांच्या किमतीत वाढ : विद्यानंद बेडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांधकाम साहित्याच्या दरामध्ये रोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापूर्वी सर्वसाधारण बांधकाम खर्चाचा प्रतिचौरस फूट दर 2000 ते 2200 रुपये होता. बांधकाम साहित्यातील वाढीमुळे हा दर आता 2500 ते 2800 रुपये प्रति चौरस फुटापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे घरांच्या किमतीत 400 ते 500 रुपये प्रति चौरस फूट वाढ होणार असल्याची माहिती क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बांधकाम साहित्याच्या दरातील झालेल्या वाढीमुळे बांधकाम व्यावसायिकांचीही मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. सदस्यांच्या झालेल्या आढावा बैठकीनंतर बांधकाम संदर्भातील दरात वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलैला नाही असे सांगत, याबाबत यावेळी व्यथा मांडण्यात आली.

लॉकडाऊन व इतर देशांतर्गत व जागतिक निर्बंधाचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. वाढत चाललेले जागतिक निर्बंध, डिझेल, पेट्रोल दरातील भरमसाठ वाढ, कोळशाची टंचाई, कच्च्या मालाच्या आयातीत होणारी दिरंगाई याचा फटका बांधकाम साहित्य उत्पादकांना बसत आहे. यामध्ये प्रामुख्याने स्टीलच्या दरामध्ये ९० टक्के, सिट ४८ टक्के, व्हीटीफाईड टाईल्स टक्के, अल्यमिनियम ८८ टक्के अशी भरमसाठ वाढ झाली आहे. केंद्रीय स्तरावर याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास बांधकाम क्षेत्राची वाढ खुंटणार असून सर्व सामान्यांचे घराचे स्वप्न साकार होणे कठीण आहे. शिवाय बांधकाम क्षेत्राशी निगडीत इतर २०० ते २५० पूरक व्यावसायीक अडचणीत येणार आहेत.

एकीकडे शासन सर्वांसाठी घरे उपलब्ध करण्याचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे या बांधकाम साहित्यांच्या दर वाढीवर कोणतेच नियंत्रण नाही. ज्या ग्राहकांनी याआधी फ्लॅटचे बुकींग केले आहेत. त्यासर्व सदनिकाधारकांवर कोणतीही दरवाढ न करता मुदतीत फ्लॅट ताब्यात देण्याचे बंधन मात्र विकसकावर असते. आता पुढील काळामध्ये बांधकाम साहित्यातील दरवाढीमुळे सदनिकांच्या किमतीत ३०० ते ५०० रुपयापर्यंत दरवाढ केल्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे बेडेकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव प्रदीप भारमल, खजिनिस गौतम परमार ,सहसचिव श्रीधर कुलकर्णी, सहखजिनिदार पवन जामदार,संचालक कृष्णात खोत, गणेश सावंत, लक्ष्मीकांत चौगुले आदी उपस्थित होते.