पुढील तीन तासात पावसाची शक्यता

कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा कडाका तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे आता वातावरणातील बदलांना वेग आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील तीन तासांत पाऊस पडणार आहे. राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात हा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. हा पाऊस पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या प्रदेशात कोसळणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या वादळी प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. दक्षिण भारतातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातील तुरळक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची तसेच सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.राज्यातील पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या प्रदेशात पाऊस पडणार आहे.