आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंटी पाटील उतरले मैदानात

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आता उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झपाट्याने काम करत आहेत आणि मैदानात उतरले आहेत.

काँग्रेस पक्षाने काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना विश्वासात घेऊन निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेस पक्षाकडून डिजिटल सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाकरिता कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर कामाला लागावे असे आदेश बंटी पाटलांनी दिलेले आहेतकोल्हापुरातील प्रत्येक तालुक्यातील १०० टक्के डिजिटल सभासद नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.

काही ठिकाणी आपण स्वबळावर तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवणार आहोत असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. या वेळी आमदार ऋृतुराज पाटील, आमदार राजू आवळे, गुलाबराव घोरपडे,गोकुळचे संचालक बयाजी शेळके आदी उपस्थित होते.