महेंद्र ज्वेलर्सतर्फे पाच पिढ्यातील महिलांचा सन्मान


कोल्हापूर : महिला दिनानिमित्त येथील महेंद्र ज्वेलर्सच्यावतीने आज पाच पिढ्यातील महिलांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मधुरिमाराजे छत्रपती या उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, महिला ही कुटुंबाचा कणा असते, ती कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवते. त्यामुळे कुटुंबाकडे लक्ष देत असतानाच महिलांनी आत्मसन्मान ही जपला पाहिजे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या कुटुंबातील पाच पिढ्यातील महिलांचा महिंद्र तर्फे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला देविचंद ओसवाल, चंद्रकांत ओसवाल, नितेश ओसवाल आदीसह मान्यवर उपस्थित होते. महेंद्र बेलोसे, भरत ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले.