‘राधानगरी’तील ७५ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांना मंजुरी : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : राज्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील ७४.५० किलोमीटरच्या रस्त्यांना मंजूरी मिळाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता हवा असतो. त्यामुळे शेतातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेत रस्ता किंवा पाणंद रस्ता असणे खूपच आवश्यक असते. पावसाळ्यात तर पायी मार्ग सुद्धा खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात सुद्धा जाणे मुश्किल होते. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने हा एक महत्वकांक्षी निर्णय घेतला असून मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून राधानगरी विधानसभा मतदार संघातील 74.50 कि.मी. रस्त्यांना मंजूर मिळालेली आहे. यासाठी गेली दोन वर्षापासून या विभागाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
पहिल्या टप्प्यातील राधानगरी तालुक्यातील गावे : तुरंबे, ठिकपुर्ली, कासारपुतळे, सावर्डे, एैनी, कसबा वाळवे, तारळे, शेळेवाडी, सरवडे, बारडवाडी, राशिवडे बुद्रुक, राशिवडे बुद्रुक, चंद्रे, येळवडे, ठिकपुर्ली, ठिकपुर्ली, चांदेकरवाडी, धामोड, चाफोडी, वाघवडे, मोहडे, बेले रशिवडे, आवळी बुद्रुक, आवळी खुर्द, आमजाई व्हरवडे, आणाजे, म्हासूर्ली.

भुदरगड तालुक्यातील गावे :कूर, टिक्केवाडी, मिणचे खुर्द, गंगापूर, बसरेवाडी, सोनारवाडी, मडिलगे खुर्द, मडिलगे बुद्रुक, पंडीवरे, पळशिवणे, सालपेवाडी, कोनवडे, आकुर्डे, गिरगाव, पाल, भेंडवडे, पांगीरे, आरळगुंडी, नांदोली, शेळोली, वेंगरुळ, वेसर्डे, मोरेवाडी, पाचर्दे, नाधवडे, पळशिवणे, गंगापूर, पुष्पनगर, मडुर, म्हसवे, देवर्डे.