कोल्हापूर : युक्रेन-रशिया या युद्धामुळे युक्रेन येथे शिक्षण घेत असलेले भारतातील हजारो विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेली आर्या चव्हाण कोल्हापूर येथे सुखरूप पोहचली. याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी तिच्या शुक्रवार पेठेतील घरी भेट देऊन युक्रेन ते कोल्हापूर असा प्रवास समजून घेतला आणि शुभेच्छा दिल्या.
आपले अनुभव सांगताना आर्या चव्हाण हिने केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनमोल सहाय्य लाभले असे सांगत आभार व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामुळे भारतीय म्हणून बाहेरील देशामध्ये लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचे नमूद केले. अशा कठीण प्रसंगी राष्ट्रप्रेम आणि देशाचा तिरंगा ध्वजाचा अभिमान असल्याचे नमूद केले.
यावेळी आर्या चव्हाण यांच्या आई-वडीलांनी मनोगतामध्ये आपल्या देशामध्ये देखील जास्तीत जास्त मेडिकल कॉलेज निर्माण झाली पाहिजेत अशी आशा व्यक्त केली.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थिनी आर्या चव्हाण हिच्या सोबत दुरध्वनीद्वारे संवाद साधला. अनेक गोष्टींची माहिती घेत ती सुखरूप घरी पोचल्याबद्दल समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संदीप कुंभार, दीपक काटकर, दिग्विजय कालेकर, सुनिल पाटील, सिद्धांत भेंडवडे, नितीन चव्हाण, सचिन चव्हाण, राजेंद्र ओतरी, अरविंद सुर्यवंशी, राजू कुंभार, मिलिंद यादव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.