
कोल्हापूर : तरुणांनी प्रशासकीय सेवेत येताना डोळे उघडे ठेवून यावे म्हणजे निराशा येणार नाही. प्रशासकीय सेवेत सतर्कता महत्वाची आहे, असे मत राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी व्यक्त केल.
ते अरुण नरके फाउंडेशन च्या वतीने कैलासवासी सुनिता अरुण नरके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित प्रशासकीय सेवा व तरुणांपुढील आव्हाने या विषयावर झगडे बोलत होते.
आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की तरुणांनी प्रशासकीय सेवेत येणे गरजेचे आहे पण प्रशासकीय सेवेत देताना डोळे उघडे ठेवूनच यावे लागेल . तरुणांनी प्रशासकीय सेवेचा अभ्यास करून शासकीय सेवेचा अभ्यास करताना कायम आपला दुसरा पर्याय खुला ठेवावा म्हणजे निराशा येणार नाही.
प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रचंड मेहनत व आत्मविश्वास याची गरज आहे. येत्या पंधरा वर्षात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असल्याने 65% टक्के नोकऱ्या नष्ट होणार आहेत आणि हे आव्हान पेलणे गरजेचे आहे.या कार्यक्रमात महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे संचालक सुनील देसाई यांचा सत्कार झगडे यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी अरुण नरके फाउंडेशन चे प्रमुख चेतन नरके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण नरके, गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील. संचालक तसेच प्रशासकीय सेवा परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.