बोगस टोळी कार्यरत; व्यावसायिकांची राजरोसपणे लूट
कोल्हापूर : तुमच्या दुकानात कमी दर्जाचा माल आहे, दरही जादा लावला आहे. आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत, अशी बतावणी करून ग्राहक संरक्षण संघटनेचे आपण पदाधिकारी असल्याचे भासवत काही महिला व्यापाऱ्याची लूट करीत आहेत.
बोगस ग्राहक संरक्षण संघटनेच्या नावाखाली महिलांची टोळी कोल्हापूर शहरात कार्यरत आहे. तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांना भीती दाखवून पैसे उकळत आहेत. यासाठी रॅकेटच चालवलं जातं आहे. दुकानात जाऊन तपासणीचे नाटक केल्यानंतर एक – दोन दिवसात या टोळीतल्या भामटया महिलांकडून त्या व्यावसायिकास फोन करून चर्चा करून आमची संस्था देशपातळीवरची आहे.
आम्ही तुमच्यावर कारवाई करू शकतो, अशी भिती घातली जाते. तुम्हाला यामध्ये शिक्षा ही होऊ शकते, असे सांगून आमचे मेन साहेब मुंबईत असतात त्यांच्या बरोबर बोला, असे सांगून फोन जोडून देतात. तिकडून भिती घालत आमच्या मँडम काय सांगतात तसे करा, अशी सुचना दिली जाते.
त्यानंतर दोन दिवसात एखाद्या बागेत अथवा कमी गर्दीच्या ठिकाणी फोन करून बोलवून मांडवलीसाठी बोलावले जाते. खंडणी वसूल झाली नाही तर अन्न औषध भेसळ प्रशासनाकडे शिष्टमंडळान घेऊन जाऊन तक्रार दिली जाते. अशा या टोळीत महिलाना पूढे केले जात असून या टोळीने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेकांना गंडा घातला आहे. शहरात चार तर जिल्हात कांही गंडा घालणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत.
ग्राहक संस्थाचे नावाखाली फसवणूकीचा हा गोरख धंदा सुरू आहे. बदनामीची भीती व कशाला झंझट म्हणून लोक पैसे देतात. त्यामुळे यांचे धाडस वाढते यांचा बोगस धंदा फोफावत आहे. मुळात प्रशासन कार्यरत असताना यांना तपासणीचा अधिकारी कोणी दिला हा प्रश्न आहे. पोलीस व ज्यांच्या नावे ही फसवणूक सुरू आहे. त्यांनी अशा बोगस टोळीचा छडा लावून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.