साजणीत जमिनीच्या वादातून कबनूरच्या शेतकऱ्याचा खून

इचलकरंजी : इचलकरंजी नजीकच्या साजणी येथे जमिनीच्या वादातून कुर्‍हाडीने वार शेतकऱ्याचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. मुनाफ सत्तारमेकर (वय,६८, रा. कबनूर) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
साजणीतील संकणामळ्यातील कबनुर येथे राहणारे मुनाफ सत्तारमेकर यांचा मृतदेह सापडला. त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, संशयित हल्लेखोर नितीन कोनेरे हा स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला. सत्तारमेकर यांचा शेतजमिनीच्या वादातून खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक के.एन. पाटील आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळास भेट दिली.