विज्ञान शिक्षक पदोन्नतीसाठी सर्वसाधारण सभेत मंजुरी घ्यावी

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्गातून विज्ञान शिक्षक या पदावर पदोन्नती करणेत येणार, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात यावी याबाबतचे निवेदन आज (बुधवारी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी दिली आहे.

भोजे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले विज्ञान शिक्षक या पदावर पदोन्नती करण्यात येणार असल्याचे असलेचे समजते. प्राथमिक शाळा तसेच विद्यार्थ्यांकरिता सदर विषयासाठी उपलब्ध होणारे शिक्षक हे अतिशय महत्वाचे असे पद आहे.

तेंव्हा सदर पदोन्नती करताना शासन निर्णयातील तरतूदीच्या अधीन राहूनच पदोन्नती आदेश देण्यात यावेत. पात्र शिक्षक यांनाच पदोन्नती देणेत यावी. तसेच सदर विषय ९ मार्च च्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेस घेऊन तशी सभागृहाची मान्यता घेणेत यावी व त्यानंतर सदर पदोन्नती आदेश काढणेत यावे. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनावर माजी महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, सदस्य महेश चौगुले तसेच विजय बोरगे यांच्यासह इतर सदस्यांच्या सह्या आहेत.