महाबळेश्वर बस आगारात २ पर्यटन बसेस दाखल

महाबळेश्वर । महाबळेश्वर येथे सहलीसाठी येणाऱ्या पयर्टकांना नजरे समोर ठेवून राज्य परीवहन महामंडळाने खास तयार केलेल्या 2 पयर्टन बसेस महाबळेश्वर बस आगारात दाखल झाल्या असुन आज महाशिवरात्रीच्या मुहूतार्वर या बसेसचे उद्घाटन करण्यात आले.

आज केवळ क्षेत्र महाबळेश्वर येथे यात्रेकरूंसाठी या बसेस सोडण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक नामदेव पंतगे यांनी दिली.महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन प्रसिध्द असलेले महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी साधारण दरवर्षी वीस लाख पयर्टक भेट देतात. या पयर्टकांना येथील निसर्गस्थळांना भेटी देवुन निसर्ग सौंदर्याचा आंनद लुटता यावा. यासाठी राज्य परीवहन महामंडळाने खास बसेस तयार केलेल्या आहेत. या दोन बसेस आज महाबळेश्वर एस टी आगारात दाखल झाल्या आहेत. या बसेसचे विशेष बाब म्हणजे या बसेस सवर् बाजुंनी पारदशर्क आहेत. या बसेसच्या खिडक्या मोठया आकाराच्या आहेत. जेणेकरून पयर्टकांना या बसेस मधुन बाहेरील निसगर् सौदयर् सहज नजरेस पडेल अथवा पाहता येईल. या बसेस पाॅंईटकडे रवाना झाल्यानंतर चालु बसमधुन या बसेचा चालक बसमधील पयर्टकांना निसगर् स्थळांची माहीती देणार आहे.

बस चालकाने दिलेली माहिती बसमधील पयर्टकां पयर्ंत सहज पोहचावी या साठी बस मध्ये स्पिकरची सोय करण्यात आली आहे. या बसेस मध्ये पयर्टकांच्या सुरक्षेची देखिल काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र सीटबेल्टची सोय करण्यात आली आहे. या बसचा टप देखिल काचेचा तयार करण्यात आला आहे.

या बसेस हंगामात रोज सकाळी किल्ले प्रतापगड दर्शन, रोज दुपारी महाबळेश्वर दर्शनसाठी रवाना करण्यात येणार आहे. सातारा येथील पयर्टकांना देखिल या बसचा आनंद घेता येणार आहे. कारण या बसेस रोज सातारा येथुन सकाळी सात वाजता सुटणार आहेत व दशर्न पुर्ण झाल्यानंतर पुन्हा सातारा येथे परत जाणार आहेत.