शाहरुख खानसाठी ‘गुडन्यूज’

मुंबई (वृत्तसंस्था) : बॉलीवूडचा किंगखान शाहरुख खानसाठी गुडन्यूज आहे. त्याचा मुलगा आर्यनकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचं चौकशीत उघड झाल्याने त्याला दिलासा मोठा मिळाला आहे.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. नंतर त्याची जामीनावरही सुटका करण्यात आली. मात्र या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. या कारवाईमुळे मंत्री नवाब मलिक एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात कलगीतुरा रंगला होता.

 ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खान सहभागी होता. याच्याकडे ड्रग्ज सापडल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली होती. नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असं एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीने केलेल्या तपासात उघड झालं आहे. आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नसल्याचेही या समितीनं म्हटलं आहे. तसंच अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज हे व्यावसायिक वापराच्या प्रमाणापेक्षा कमी होते, तसेच ते आर्यन खानसाठीच होते हेही तपासामध्ये कुठेही सिद्ध झालं नाही. त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे.