स्वाभिमानीचा महावितरण कार्यालयासमोर अभिषेक

शेतीला दिवसा विजेच्या मागणीसाठी उपोषण: शाहुवाडीतून चालत येत महिलांचा पाठिंबा

कोल्हापूर : शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गेल्या आठ दिवसापासून सुरू असेलेले बेमुदत धरणे आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शासनाला जाग यावी म्हणून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री महाशिवरात्रीचे औचित्य साधून महावितरण कार्यालयासमोर अभिषेक घातला.

    गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात राजू शेटटी हे महावितरण कार्यालयासमोर ठाण मांडूण बसले असून त्यांनी केलेल्या मागण्याबाबत व केलेल्या आरोपावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.शेट्टी यांनी आंदोलनाच्या दुसरा टप्प्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर सरकारकडून या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केल. या आंदोलनास जिल्ह्यातील विविध नेत्यांबरोबच जिल्ह्यातील जवळपास दीडशेहून अधिक  ग्रामपंचायती, विविध संस्था, सेवा सोसायटी यांचेसह सामाजिक संस्थाकडून पाठिंबा मिळाला आहे. 
  मंगळवारी शाहुवाडी तालुक्यातून अणुस्करा येथून जवळपास ७० हून अधिक महिला व शेतकरी गेल्या तीन दिवसापासून चालत येऊन आज या आंदोलनास पाठिंबा दिला व डोंगरी भागातील शेतक-यांना वन्यप्राण्यापासून सरंक्षण होण्यासाठी दिवसा वीज गरजेचे असलेने आम्ही ही पदयात्रा काढल्याचे सांगितले.