कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडून तयार करण्यात आलेली श्री करवीर निवासिनी अंबाबाईची ५१ किलो चांदीची मूर्ती आज देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली.
या निमित्त कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होत. रांगोळी, आकर्षक रोषणाई या बरोबरच धनगरी ढोल आणि वाद्यांचा गजरात निघालेल्या या शोभायात्रेची सुरवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
कोल्हापू सराफ व्यापारी संघाने ५१ किलो वजनाची श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती विधिवत शोभायात्रा काढून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं आज सुपूर्द करण्यात आली. या शोभायात्रेची सुरवात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि माजी राज्यपाल डॉ. डी.वाय पाटील यांच्या हस्ते गुजरी कॉर्नर येथून करण्यात आली.