कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वच भागात रेशन दुकानातील संगणकीय त्रुटीमुळे रेशन ग्राहक १५ फेब्रुवारी पासून सतत रेशन दुकानात हेलपाटे मारत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने ग्राहक रेशन आणण्यासाठी जात असता त्याला त्या सर्व्हर डाऊन मुळे आपले हक्काचे धान्य मिळत नाहीत.
अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. मुळातच फेब्रुवारी महिन्याचे धान्य दुकानदारांना वेळाने मिळाले असल्याने ते धान्य वाटप करत असताना सर्व्हर डाऊन असल्याने धान्य घेण्यासाठी येणारा ग्राहक परत जात आहे. तसा हा खेळ साधारण १५ फेब्रुवारी पासुन सुरू आहे. महिना संपत आल्याने ग्राहक या महिन्याचे आपल्याला धान्य मिळेल का नाही अशा भितीयुक्त संभ्रमा अवस्थेत आहे. त्यामुळे रेशन ग्राहकांना झालेला त्रास लक्षात घेवून आपण फेब्रुवारीतील धान्य नेण्यासाठी मार्च महिन्यातील १० दिवस मागील रेशन न मिळालेल्या लोकांना वाढवून दयावेत जेणे करून रेशन पासून कोणताही ग्राहक वंचित राहता कामानये तसेच या सर्व बाबींचा जादा त्रास दुकानदारांना व दुकानातील काम करणाऱ्या कामगारांना देखील होणार आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन याचे योग्य नियोजन लावून रेशन ग्राहकांना सहकार्य करावे तसेच नोकरदार वर्गामुळे घरातील रेशन हे बऱ्याचदा घरातील वृध्द मंडळींना आणावे लागते कडक उन्हाळा चालु झाल्याने ह्या उन्हाचा त्रास वृध्द मंडळींना होतो. त्यामुळे किमान उन्हाळा असे पर्यंत तरी दुकानदारांनी सकाळी उघडण्याची वेळ किमान १ तास लवकर करावी अशा सुचना दुकानदारांना देण्यात याव्यात या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार विपीन लोकरे, करवीर पुरवठा अधिकारी दत्तात्रय पाडळकर यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी रेशन दुकानांमधील संगणकीय त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करून लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील रेशन वाटपाची मुदत मार्चमधील दहा दिवस वाढवून देऊ असे आश्वासन दिले व जर कोणी रेशन दुकानदार धान्य देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्यांची नावे आम्हाला कळवा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, धान्यापासून कोणीही रेशन धारक वंचित राहणार नाही असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव,रिक्षासेना जिल्हाप्रमुख राजू जाधव,कामगारसेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, रिक्षासेना शहरप्रमुख वसंत पाटील,बाबुराव पाटील, सुनील पारपाणी आदी उपस्थित होते.