आजचं राशीभविष्य मंगळवार, १ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया..
मेष:-
प्रेमभावना वाढीस लागेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यापार विस्ताराचा विचार कराल. आपले महत्व इतरांना पटवून द्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
वृषभ:-
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. स्त्रीवर्गाशी मैत्री कराल. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. चारचौघात तुमचे कौतुक होईल. आर्थिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.
मिथुन:-
औद्योगिक वातावरण चांगले राहील. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. सहृदयतेने वागणे ठेवाल. मित्रांच्या ओळखीने कामे केली जातील.
कर्क:-
मनाची विशालता दाखवाल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल.
सिंह:-
जवळच्या सहलीचा आनंद घ्याल. मित्रमंडळी जमवाल. रेस, सट्टा यांतून लाभ होईल. सासुरवाडीची मदत मिळेल. काही कामे कमी श्रमात पार पडतील.
कन्या:-
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडी-निवडी वर भर द्याल. एकमेकांची बाजू उत्तमरीत्या समजून घ्याल. पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल.
तूळ:-
लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळशीपणा करू नका. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. ऐषारामाच्या गोष्टींची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
वृश्चिक:-
मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. मित्र परिवारात भर पडेल. आधुनिक विचार मांडाल. हातून चांगले लिखाण होईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
धनू:-
मानसिक समाधान लाभेल. मदत करण्याचा आनंद कमवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.
मकर:-
कुंभ:-
कामाचा व्याप वाढू शकतो. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ जाईल. आवडत्या वस्तु खरेदी कराल. एकलकोंडेपणा बाजूला ठेवावा. गुरूजनांचा सहवास लाभेल.
मीन:-