कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी मुंबई येथे आझाद मैदानात सुढरू केलेले बेमुदत उपोषण आज राज्य शासनाच्या वतीने मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर मागे घेण्यात आले. त्यानंतर कोल्हापुरात दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते .त्याला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात दसरा चौकात तीन दिवस साखळी उपोषण करण्यात आले.
आज सायंकाळी छ.संभाजी महाराज यांनी शासनाने मागण्या मान्य केल्या नंतर उपोषण मागे घेतले .त्यानंतर दसरा चौकात सायंकाळी कार्यकर्त्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत साखर वाटून जल्लोष केला तसेच दसरा चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व इथून पुढेही मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.