खासदार संभाजीराजेंचे उपोषण मागे; लढ्याला यश

मुंबई : राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन राज्य शासनाने दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी आमरण उपोषण मागे घेतले.

खासदार संभाजीराजे हे शनिवार, दि. २६ पासून येथील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले होते.

मुख्यमंत्री उद्घव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सर्व मागण्या मंजूर करत असल्याचे लेखी पत्र दिल्याने लहान मुलांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन मागे घेतले.