कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरु केलेल्या आमरण उपोषणाला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी बार असोसिएशनच्या सदस्यांनी पाठिंब्याचे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके यांनी दिले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुनील चव्हाण, सचिव विजयकुमार ताटे- देशमुख, सचिव संदीप चौगुले, संकेत सावर्डेकर आदी उपस्थित होते.