संभाजी राजे छत्रपतींचे समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू… बाळासाहेब थोरात

नागपूर : मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजी राजे यांनी कोल्हापुरात उपोषण सुरू केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली. मराठा आरक्षण व समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्या, ही संभाजी राजे यांची प्रमुख मागणी आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात नागपुरात म्हणाले, खासदार संभाजी राजे आज उपोषणाला बसतायत. त्यांना आम्ही उपोषणाला बसू नका, अशी विनंती केली होती. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी करायची आहे. संभाजी राजे यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काम करतंय. मुख्यमंत्री आणि आमची परवा बैठक झाली. काही निर्णय घेतले. बरंच काम झालंय. पण खासदार मोहदयांना ते सांगण्यात आम्ही अपयशी पडलोय. त्यांचे समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन बाळासाहेब थोरात यांनी दिलं.