प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज शिवजयती उत्साहात साजरी

आंबेवाडी येथील सहा तरुण मंडळाच्या वतीने संयुक्त पद्धतीने पन्हाळा येथून शिवज्योत आणत असताना सर्व मंडळांचे कार्यकर्ते

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली आंबेवाडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

आंबेवाडी येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून येथील शिवसेना शाखेचे सह जय शिवराय मित्र मंडळ संघर्ष ग्रुप रवी फ्रेंड सर्कल डेंजर ग्रुप आंबेवाडी फुटबॉल क्लब या सहा तरुण मंडळानी गाव पातळीवरील गटतट बाजूला ठेवून संयुक्त पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेऊन एकीचे दर्शन घडविले.

दरम्यान सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पूजन पार पडले, पन्हाळा येथून शिवज्योत आणून मिरवणुकीची चे प्रदर्शन केले प्रयाग चिखली येथील सरदार तालीम मंडळाने सालाबाद प्रमाणे विविध विविध स्पर्धांचे आयोजन करून विधायक पद्धतीने शिवजयंती साजरी केली त्याचबरोबर वरणगे पाडळी रजपुतवाडी सोनतळी निटवडे वडणगे केर्ली किर्ले आदी गावांमध्येही शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली ठिकाणे कोरोणा चे नियम पाळण्यासाठी प्रबोधनही करण्यात आल.