जिल्ह्याचा हेल्थ इंडेक्स वाढवण्यासाठी प्रशासन-रोटरीने एकत्रित प्रयत्न करावे

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्यावतीने देण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे स्वीकारताना डी वाय पाटील हॉस्पिटलच्यावतीने स्वीकारताना डॉ शिंपले शर्मा, डॉ वैशाली गायकवाड, डॉ आर के शर्मा. यावेळी सचिन मालू, गौरीश धोंड,करुणाकरन नायर यांच्यासह रोटरीयन्स उपस्थित होते.

कोल्हापूर : डी. वाय. पाटील हॉस्पिटलला रोटरी कडून २२ लाखांची वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आले यावेळी कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असून कोल्हापूर जिल्ह्याचा हेल्थ इंडेक्स वाढविण्यासाठी प्रशासन, रोटरी व डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांनी सयुक्तरीत्या काम करावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

रोटरीचे सर्व क्ल्बनी एकत्र येऊन प्रत्येक तालुका दत्तक घ्यावा व तेथे तेथिल आरोग्य सुविधा विकसित करण्यात पुढाकार घेतल्यास जिल्हा आरोग्यदृष्ट्या विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्यावतीने डी. वाय. पाटील हॉस्पिटलला २२ लाख किमतीची वैद्यकीय उपकरणे प्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून नामदार पाटील बोलत होते. नीती आयोगाकडून दरवर्षी हेल्थ इंडेक्स जाहीर केला जातो. या इंडेक्समध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहील यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. शासन म्हणून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना सर्व रोटरी क्लब व डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांनी एकत्रित काम केल्यास अधिक गती येईल, त्यातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत बनेल असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजने गेल्या २५ वर्षत कोल्हापूरच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. कोविड काळात अतिशय उत्तम काम केले आहे. गेल्या दोन वर्षपासून हा क्लब डी. वाय. पाटील हॉस्पिटलसोबत काम करत आहे. दुसऱ्या लाटेवेळी हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्स्टेटर व सिलिंडर दिले होते. त्यामुळे अनेक कोरोनाग्र्स्त रुग्णांना बरे करण्यात यश आले होते. यापुढेही रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे सहकार्य निश्चित लाभेल याची खात्री असलायचे त्यांनी सांगितले.रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थिती यावेळी ७ सिरींज पंप, २ व्हेन व्ह्यूअर मशिन, ५ पेशंट मॉनिटर व २ व्हिडीओ लारीन्जोस्कोप आदी उपकरणे यावेळी डी. वाय. पाटील हॉस्पिटलला प्रदान करण्यात आली. , डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांनी हॉस्पिटलच्यावतीने ती स्वीकारली.

*अत्याधुनिक नवजात शिशु विभाग उभारणार*

प्रेसिडेंट सचिन मालू यांनी समाजातील गरीब व गरजवंत लोकांना अत्यंत माफक किमतीत आरोग्यसुविधा देण्यासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल काम करत आहे. येथे दिलेल्या मदतीचा उपयोग ज्यांना आरोग्यसुविधा परवडत नाहीत किवा ज्यांच्यापर्यंत त्या पोहचत नाहीत अशा खऱ्या गरजुना होतो. त्यामुळे या हॉस्पिटलला वैद्यकीय मदत देत आहोत. पुढील काळात नवजात शिशुंसाठी या ठिकाणी ग्लोबल रोटरी फंडमधूनअत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यास मदत करणार असल्याचे मालू यांनी सांगितले.

*स्पाईन विभागासाठी उपकरणे देणार*

डीस्ट्रीक्ट गव्हर्नर गौरीश धोंड यांनी हॉस्पिटलमधील सोयी सुविधांचे कौतुक करत यापुढेही आपले सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. हॉस्पिटलच्या सिम्युलेशन लॅबमुळे आपण अत्यत प्रभावित झालो असून असे अत्यधुनिक तंत्रज्ञान उत्कृष्ट आरोग्य सेवेची हमी देत असल्याचे त्यांनी सांगितले. हॉस्पिटलच्या स्पाईन विभागासाठी आवश्यक मशिनरी उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी डीस्ट्रीक्ट गव्हर्नर गिरीश धोंड, फर्स्ट लेडी प्रतिमा मॅडम, पास्ट डीस्ट्रीक्ट गव्हर्नर गिरीश मसुरकर, डीस्ट्रीक्ट गव्हर्नर नॉमिनी नसीर बोरसदवाला, असिस्टट गव्हर्नर करुणाकर नायर, प्रेसिडेंट सचिन मालू, सचिव दिव्यराज वसा, सीएजी सचिन मालू, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, प्रकुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, रोटरियन सुर्यकांत बुधिहाळकर, प्रवीण कुंभोजकर, ऋषिकेश केसकर,अभय विचकर, दिलीप प्रधान आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुरुची पवार व डॉ. निवेदिता पाटील यांनी केले, तर आभार डीन डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी मानले.