गडिंग्लज मध्ये शिवजयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी

गडिंग्लज: गडिंग्लज शहर व तालुक्यात विविध उपक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांची गावोगावचे शिवभक्त ज्योती घेऊन धावत जात होते गडिंग्लज शहर शिवमय झाले होते.

दसरा चौकातील शिवाजी महाराजांच्यापुतळ्याजवळ विविध पक्षांनी पुष्पहार घालून शिवाजी महाराजांना वंदन केले संध्याकाळी गडिंग्लज शहरात शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौकातून बैलगाडी लेझीम पथकाच्या नादातभव्य रॅली काढण्यात आली जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे व गडिंग्लज शहर अध्यक्ष संतोष चिकोडी वगैरे कार्यकर्ते शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणुकीनेचित्र रथमन प्रसन्न करणारे होतेपोलीस प्रशासनाचे यावर्षी मिरवणुकीला परवानगी नसल्याचे कळते त्यामुळे याची चर्चा ऐकू येत होती ग्रामीण भागात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे तर काही ठिकाणी पुतळ्यांचे पूजन करण्यात आलेया शिवजयंती मिरवणुकीत उंची उपस्थिती दिसत होती या पद्धतीने सर्वत्र शिवजयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.