न्यूज मराठी 24 चे कार्यकारी संपादक सुरेश पाटील यांचा गौरव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतील विविध उपक्रम,विकासात्मक काम तसेच नाविन्यपूर्ण योजनांबाबत केलेल्या वार्तांकनाबाबत जिल्हा परिषदेच्यावतीने न्यूज मराठी 24 चे कार्यकारी संपादक सुरेश पाटील यांना गौरविण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन पाटील यांना गौरविण्यात आले. यानंतर सर्व स्तरांतून सुरेश पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा आणि तालुकास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार, आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार तसेच अन्य विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी पत्रकारांना ही सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण जि.प.चे.सदस्य, पदाधिकारी,अधिकारी आदि उपस्थित होते.