शासकीय कर्मचारी बुधवार पासून संपावर

कोल्हापूर: सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येत्या २३ व २४ फेब्रुवारी रोजी संपावर जाणार आहेत अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल लवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, जुनी पेन्शन योजणा लागू करावी.तसेच विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी दूर करण्यात याव्यात यासह अन्य मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी या संपाचा निर्णय घेतला आहे.या संपात जिल्ह्यातील ६५ हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला भरत रसाळे ,अनिल घाटगे उपस्थित होते.