शाहू ग्रुपच्या वतीने शिवजयंती साजरी

कागल येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करताना राजे विरेंद्रसिंह घाटगे

कागल : येथील शाहू ग्रुपच्या वतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी केली. बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित खर्डेकर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास श्री.घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे ,शाहूचे संचालक यशवंत माने ,युवराज पाटील,सचिन मगदूम,सुनिल मगदूम,भाऊसाहेब कांबळे,प्रताप पाटील,बाबगोंडा पाटील, धैर्यशील इंगळे,उमेश सावंत,रणजीत पाटील,नंदकुमार माळकर,राजेंद्र जाधव, ,दीपक मगर, आप्पासाहेब भोसले,अजितसिंह घाटगे,प्रमोद कदम,सतिश माळी,बाळू हेगडे,बाळू नाईक,बाळासाहेब जाधव,अरूण गुरव,असिफ मुल्ला,रमीज मुजावर नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती उत्साहात साजरी

कागल प्रतिनिधी येथील श्री.छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती उत्साहात साजरी केली. कारखान्याचे संचालक यशवंत माने यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी संचालक सचिन मगदूम कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.