जयसिंगपूर: येथील रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीच्या वतीने शाहूनगर येथील उद्योजिका सौ. करुणा अजितराव पवार यांना व्यावसायिक सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल शरद पै यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले.मौजे आगर येथील छत्रपती शाहू औद्योगिक वसाहतीतील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. रोटरीचे डिस्ट्रिक्ट चेअरमन बाळासाहेब देवनाळ प्रमुख उपस्थित होते. याचवेळी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या व्यवसायात प्रगती करणार्या कर्तबगार महिला श्रीमती कविता भोजकर, सौ. संजीवनी कंदले, श्रीमती वैशाली हावळे, सौ. स्वाती भापकर, सौ. अनिता बिडवे यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.स्वागत अध्यक्ष दादासाहेब चौगुले यांनी केले. प्रास्ताविक करसल्लागार सुदर्शन कदम यांनी केले. परिचय प्रमोद भोजे यांनी करून दिला. आभार नरेंद्र पाटील यांनी मानले. यावेळी उद्योगपती राजेंद्र मालू, रुस्तुम मुजावर, अविनाश पट्टणकुडे, टी. बी. पाटील, नंदू बलदवा, राम बोंडगे, पी. के. कांबळे, शंकर बंडगर, बजरंग सोमाणी, नगरसेवक बजरंग खामकर, अन्सार चौगुले, गणपतराव बेळकूड, जयदीप शेट्टी, सचिन रायनाडे, हर्षवर्धन फडणीस, अजितकुमार कोरे, इंद्रनील चौगुले आदि उपस्थित होते.