अब्रु नुकसानीच्या दाव्यासाठीच्या हेलपाट्यांनीच मरणार….. चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये बेछूट आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे संजय राऊत, नवाब मलिकांसारखे केवळ अब्रु नुकसानीच्या दाव्यांसाठीच्या हेलपाट्यांनीच मरणार आहेत अशा तिखट शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पाटील म्हणाले, जुनी थंड प्रकरणे उकरून काढून राऊत हे ठाकरे यांनाच अडचणीत आणत आहे. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे वाटू लागले आहे. अशामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत असल्याच्या अजित पवार यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे.समीर वानखेडेंवर रोज आरेाप झाले. राष्ट्रीय मागास आयोगाने आता नोटीसा काढल्या आहेत. गेल्या २७ महिन्यात न्यायालयांनी इतके फटके देवूनही यांच्यामध्ये सुधारणा होत नाही. आता सोमय्या, काळे, कंबोज सगळेच कोर्टात जातील. राऊत यांनी धमक्या देवू नयेत. त्यांचे सरकार आहे. थेट कारवाई करून दाखवावी असे आव्हानच पाटील यांनी यावेळी दिले.मी राऊतांच्या मुलीच्या घरी जावून आलोमाझे आणि संजय राऊत यांचे वैयक्तिक शत्रूत्व नाही. त्यांच्या मुलीच्या लग्नाला जाता आले नाही मी तिच्या सासरी जावून तिला शुभेच्छा देवून आलो. परंतू माझ्या पक्षाच्या नेत्यांविरोधात आरोप केल्यानंतर मी बोलणारच असे पाटील यांनी स्पष्ट केले.