चित्रनगरीचा एक भाग जयप्रभा स्टुडिओला जोडणार

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व कायम राहून तेथे चित्रीकरण व्हावे ही कोल्हापूरकरांची लोकेच्छा पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे. यासाठी चित्रनगरीचा एक भाग जयप्रभा स्टुडिओला जोडण्याचा प्रयत्न असून याबाबत मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले,की लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक स्टुडिओत व्हावे अशी भूमिका आपण मांडली होती. तथापि स्टुडिओची दोन वर्षांपूर्वी विक्री झाल्याचे समोर आले आहे. स्टुडिओची मालकी कोल्हापूरवासियांची व्हावी ही जनभावना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तथापि या वास्तूचा वारसास्थळात समावेश असल्याने शासकीय स्तरावर कोणता मार्ग काढता येईल याचा विचार केला जात आहे.