आ.नितेश राणे सीपीआर रुग्णालयात दाखल !

कोल्हापूर (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे सध्या पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, आ.राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी आज (सोमवारी) सायंकाळी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी राणे यांच्या समर्थकांसह पोलिसांची मोठी गर्दी झाली होती.आज सकाळी त्यांच्या छातीत दुखणे वाढल्याची त्यांनी तक्रार केली. त्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात वाहनांचा ताफा रुग्णालयात दाखल झाला.