चांदोली धरणाच्या निकृष्ट बांधकामाचा छडा लावण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या चांदोली धरणाच्या कामासाठी आजपर्यंत 850 कोटी रुपये खर्च झाले असून तरीही धरणाच्या दगडी बांधकामामधून गळतीचे प्रमाण का वाढत आहे.संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरुन या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने काढल्याने खळबळ उडाली आहे

धरणाच्या गळतीने धरणाची सुरक्षिता धोक्यात आली आहे. या अनुषंगाने धरणाची संपुर्ण गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने 54 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकिय मंजुरी दिली आहे. हा प्रश्न शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी विधानसभेत वारंवार उचलून धरला होता. चांदोली येथे वारणा नदीवर वारणा धरण उभारण्याऐवजी खुजगाव या ठिकाणी धरण उभारण्याचा प्रयत्न तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा होता, मात्र राजाराम पाटील आदी नेते मंडळींनी विरोध केल्याने शाहूवाडी, शिराळा हद्दीत चांदोली या ठिकाणी 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण 1976 मध्ये उभारण्यास प्रारंभ झाला.