कोल्हापूर :जे. उदय दिग्दर्शित आणि वेदिका फिल्म निर्मित उदय जानकर यांचा मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ 4 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहणार्या 50 भाग्यवान विजेत्यांना मिळणार रॉयल एनफिल्डची बुलेट!
ही संधी दि. 4 फेब्रुवारी 2022 पासून चित्रपट चित्रपटगृहात असेपर्यंत उपलब्ध आहे.या संधीमध्ये भाग घेण्यासाठी पुढील अटी आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ‘लॉ ऑफ लव्ह’ या सिनेमाचे ई-तिकीट किंवा बॉक्स ऑफिस तिकिटाची ओरिजनल कॉपी ‘लॉ ऑफ लव्ह’ आणि वेदिका फिल्म क्रिएशन फेसबुक पेजवर दिलेल्या पत्त्यावर कुरियर करावी. झेरॉक्स किंवा स्क्रीनशॉट चालणार नाही.
तिकिटाच्या मागील बाजूस स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करावा. लकी ड्रॉ मार्फत एका विजेत्याला फक्त एक बक्षीस जिंकण्याचा अधिकार आहे. याबाबतची माहिती वेळोवेळी ‘लॉ ऑफ लव्ह’ चित्रपटाच्या आणि वेदिका फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेजवर प्रकाशित केली जाईल.निर्धारित कालावधीनंतर जमा केलेले तिकीट अवैध मानले जाईल. विजेत्यांनी ओळखपत्र (आधार/पॅन/पासपोर्ट किंवा इतर) आयोजकांना दाखविणे कायद्याने आवश्यक असेल. सिनेमाशी संबंधित कलाकार, इतर विभागांतील कर्मचारी, तसेच नातेवाईकांना या लकी ड्रॉमध्ये भाग घेता येणार नाही.