कोल्हापूर: शहापूर (तालुका हातकणंगले) येथील पोलीस कॉन्स्टेबलला दोन हजार रुपयांची लाच घेताना एसीबीकडून अटक करण्यात आली. असिफ नसिरुद्दीन सिराजभाई (रा.जवाहरनगर, इचलकरंजी) आणि जगदीश भूपाल संकपाळ (वय-38, पोलीस पाटील, यड्राव ता.शिरोळ) अशी या दोन लाचखोरांची नावे आहेत. .
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आत्याचे नावे न्यायालयाकडून वॉरंट निघाले होते. अटकेची कारवाई टाळण्याकरिता शहापूर पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. असिफ नसिरुद्दीन सिराजभाई आणि जगदीश भूपाल संकपाळ या दोघांनी मिळून 2000/- रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 1500/- रु. लाचेची मागणी करुन ती लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पोलीस पाटील जगदीश संकपाळ याला रंगेहाथ पकडले आहे. तर कॉन्स्टेबल पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे पोलिसांबरोबर ऍडजेस्टमेंट करून देणाऱ्या पोलीस पाटील संघटनेतही खळबळ माजली आहे.